श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत सामूहिक पारायणाचे फैजपूर येथे आयोजन
फैजपूर.मंडे टु मंडे न्युज |श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतच्या २१ अध्यायांच्या सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम सुमंगल लॉन कार्यालय, यावल रोड, फैजपूर येथे होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्री अभिषेकाने होणार असून त्यानंतर सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत ग्रंथवाचन, १० ते १२ वाजता उधृत ग्रंथवाचन, तसेच १२.१५ ते २.३० या वेळेत महाअभिषेक व आरती होणार आहे.
दरम्यान, सकाळी ९ ते ९.३० वाजता प्रधान संकल्प, ९.३० ते १० वाजता अल्पोपहार व विश्रांती आणि १२ ते १२.१५ वाजता श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
“स्वामी चरणी मन एकाग्र करून कृपाप्रसादाचा अमृतानुभव घ्यावा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक पारायणात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
|| श्री स्वामी समर्थ ||


