जळगावात अवैध वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन महिला आणि एक पुरुष ताब्यात
जळगाव : मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वेश्याव्यवसायावर जळगाव तालुका पोलिसांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन विभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले यांच्या पथकाने बिबा नगर परिसरात छापा टाकला. सायंकाळी सुमारे पाच वाजता ही कारवाई करण्यात आली.
कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत.


