भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

१५ ऑगस्टच्या दिवशी सावदा वाहतूक नियंत्रण कक्ष बंद ; पासेस असताना विद्यार्थी-शिक्षकांची गैरसोय

सावदा. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असताना आज सावदा येथील वाहतूक नियंत्रण कक्ष सकाळी सुमारे ६.४० वाजता बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांची पासेस असताना मोठी गैरसोय झाली.

सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावदा कक्षात बसणारा कर्मचारीच हजर नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीमुळे वाहतूक नियंत्रण कक्ष बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यामुळे सावदा, वाघोदा, वडगाव तसेच परिसरातील विद्यार्थ्यांकडे बसचे पास असूनही त्यांना वेळेत प्रवास करता आला नाही. नियंत्रण कक्ष अधिकारी पावणे सात वाजे पर्यंत कक्षात हजार नव्हता.

नियमित बसेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना पास असताना अखेर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सकाळी लवकर शाळेत पोहोचणे आवश्यक असताना वाहतूक व्यवस्थेतील या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रावेर कडे जाणाऱ्या बस रावेर कडे न पाठवता मस्कवद मार्गे पाठविण्यात आल्याने वाघोदा, वडगाव ,विवरा, जाणाऱ्या प्रवाशांना पास असताना खाजगी वाहनाने जावे लागले. काहीना मोटार सायकलने जावे लागले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नियमित लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रीय सणांच्या दिवशी संबंधित विभागाने विशेष नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!