भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पंचनाम्यातील चूक टाळण्यासाठी पिक पंचनाम्यावर आता शेतकऱ्यांची सही घेणार

मुंबई. मंडे टु मंडे न्युज || राज्यातील दुष्काळग्रस्त २६५
तालुक्यांत खरीप पिकांच्या नुकसानाचे पंचनामे पारदर्शक, वस्तुनिष्ठ व्हावेत, त्यात कोणत्याही प्रकारची चूक राहू नये, यासाठी पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही घेण्यात येणार आहे. यापूर्वी पंचनाम्यावर संबंधित सरपंच, पोलिस पाटील यापैकी एकाची सही घेण्यात येत होती.

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा शासन निर्णय २५ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला, त्यानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

काय असतील पिकांच्या पंचनाम्यात नोंदी?
पिकांच्या पंचनाम्यात संबंधित शेतकऱ्याचे नाव, ८-अ नुसार एकूण क्षेत्र, बाधित गट क्रमांक, बाधित पिकाचे नाव, बाधित क्षेत्र, नुकसानाची टक्केवारी, फार्मर आयडी, फार्मर आयडी उपलब्ध नसल्यास आधार क्रमांक, बँकेचे नाव, आयएफएससी कोड, बैंक खाते क्रमांक आणि पंचनामा केलेल्या शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय पथक पाठवणार आहे. हवामान बदलाचा खरीप पिकांवर झालेला परिणाम पाहता ही पथके या गंभीर स्थितीची माहिती घेतील,

दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी कर्नाटकात एक केंद्रीय पथक पाठवले जाईल. याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाले असल्याचे सांगून या राज्यातही पथके पाहणी करतील, आपण स्वतःही या राज्यांना वैयक्तिकरित्या भेट देऊ, असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.

या स्थितीत दुष्काळग्रस्त राज्यातील अधिकाऱ्यांनी तत्पर राहण्याचे आवाहन करून केंद्र सरकार या राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चौहान म्हणाले.

कशी मिळते केंद्राची मदत ?
राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्राचे विशेष पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची, पाण्याची व चाऱ्याची पाहणी करते. या पथकाच्या अहवालानुसार गृह मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाच्या बैठकीत अंतिम निधी मंजूर केला जातो.

याआधी केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणी?

वर्ष २०१५-१६ : केंद्रीय पथकाने ३ वेळा पाहणी दौरा केला. त्यानंतर ४,३१८ कोटी रुपये एकूण मदत मंजूर केली होती. डिसेंबर २०१५ मध्ये ३,०४९ कोटी व सप्टेंबर २०१६ मध्ये १,२६९ कोटी रुपये मंजूर केले होते. वर्ष २०१८-१९: केंद्रीय पथकाने २०१८ च्या शेवटी दौरा केला. त्यानंतर राज्यासाठी ७,९६२ कोटी रुपये मदत मंजूर करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!