रावेरसामाजिक

सावद्यात जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा शहरात संजरी ग्रुप, दोस्ती ग्रुप आणि नवाज तडवी मित्र परिवाराच्या संयुक्त पुढाकारातून ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, एकता आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी समाजबांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या महामानवाला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सावदा शहरातून उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेली वाद्ये, पारंपरिक नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीची विविधता आणि समृद्ध परंपरा अनुभवायला मिळाली. यावेळी सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पोलीस प्रशासनाच्या या सहभागामुळे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश अधिक दृढ झाला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित आदिवासी समाजबांधवांनी आपल्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे जतन करण्यासोबतच शिक्षण, सामाजिक एकता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश दिला. नव्या पिढीने आपल्या समृद्ध आदिवासी वारशाची जपणूक करून आधुनिक शिक्षण आणि विकासाची कास धरावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संजरी ग्रुप, दोस्ती ग्रुप आणि आयोजक नवाज रमजान तडवी. समीर रमजान तडवी. अध्यक्ष पिरण शवाखा उपाध्यक्ष शेर शयबु तडवी. अरबाज फकिरा तडवी. साजिद तडवी.तालिफ तडवी. अकरम तडवी. आकाश तडवी. मुसतुफा तडवी. फिरोज तडवी. अशा नवाज तडवी मित्र परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमामुळे सावद्यात आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!