भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

तरुण मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव, यावल पोलिसांनी गूढ उलगडले…

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या संशयास्पद मृत्यूला अपघाताचे रूप देणाऱ्या तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या पार्टीतील वादातून पवन रवींद्र सोळंके (वय २६) या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पवन रवींद्र सोळंके (वय २६).चा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता.या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात संशय आल्याने यावल पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी दारू पार्टीत किरकोळ वादातून पवनची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची तरुणाची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर झालेल्या या घटनेचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे.

तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला असा केला बनाव
कोळन्हावी ते डांभुर्णी या रस्त्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत 26 वर्षीय तरुण ठार झाला असा बनाव तिघांनी केला होता. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात सदर तरुणाचा अपघातात नव्हे तर खून झाल्याचे उघड झाले आहे. मयत तरूणाच्या तीन मित्रांनी त्याला दारू पाजून किनगाव डांभुर्णी रस्त्यादरम्यान असलेल्या पाटचारीवर नेऊन दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे, या प्रकरणी तीन तरुणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगड डोक्यात मारुन केली हत्या
कोळन्हावी तालुक्यातील यावल येथील रहिवाशी पवन रवींद्र सोळंके वय 26 वर्ष या तरुणाला मध्यरात्री तीन तरुण दुचाकी वर घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. व अज्ञात वाहनाच्या धडकेत याचा मृत्यू झाला असा बनाव त्यांनी केला होता. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तशी फिर्यादी देखील दिली होती. दरम्यान डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, क्राईम राईटर वासुदेव मराठे या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यात पितळ उघड पडले ,यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच, संशयीतांनी दिलेल्या कबुली नुसार उमेश दिलीप परदेशी वय 32 रा .कोळन्हावी, चेतन मोतीराम कोळी वय 32 रा.डांभुर्णी व लोकेश दिवाकर महाजन वय 32 रा.डांभुर्णी या तिघांनी मयतासह रात्री पार्टीचे नियोजन केले होते. मयत सह सहा जणांनी हे शेतात पार्टी केल्यानंतर यातील दोन मित्र एक उंटावद आणि एक कोळन्हावी येथे आपल्या घरी परत गेले. मात्र मयत पवन व उमेश परदेशी, चेतन कोळी, लोकेश महाजन हे पार्टी संपल्यानंतर देखील किनगाव येथे एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी पवनशी वाद घालून त्याला मारहाण केली आणि मध्यरात्री नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. तेव्हा संशयीतांनी दाखवलेल्या घटनास्थळाचा फॉरेन्सीक टिम कडून बारकाईने पंचनामा करण्यात आला, या प्रकरणी तिघां विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!